भिडू, दिल साफ ठेव… बाकी सगळं आपोआप जमून येतं - जॅकी श्रॉफ
मुंबई , 11 डिसेंबर (हिं.स.)। आयआयएम मुंबईच्या ''आवर्तन 2025'' या वार्षिक उत्सवात ‘खलनायक’ची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांचे लाडके हिरो जॅकी श्रॉफ जेव्हा विद्यार्थ्यांच्या मध्ये पोहोचले, तेव्हा संपूर्ण कॅम्पस जल्लोषात
मुंबई


मुंबई , 11 डिसेंबर (हिं.स.)। आयआयएम मुंबईच्या 'आवर्तन 2025' या वार्षिक उत्सवात ‘खलनायक’ची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांचे लाडके हिरो जॅकी श्रॉफ जेव्हा विद्यार्थ्यांच्या मध्ये पोहोचले, तेव्हा संपूर्ण कॅम्पस जल्लोषात न्हाऊन निघाला.

सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारताच जॅकी दादा त्यांच्या नेहमीच्या कूल अंदाजात खुलून बोलले. गप्पांच्या मस्तीत ते तर थेट पायऱ्यांवर जाऊन बसले. आणि मग दिली आपली फिल्मी-स्टाइल सल्ला ओळ — “भिडू, दिल साफ ठेव… बाकी सगळं आपोआप जमून येतं!”

दरम्यान, एका विद्यार्थ्याने दोघांना थेट प्रश्न केला—बिझनेस स्कूलनंतर जीवनात पुढे जाण्याचा खरा मंत्र काय?

त्यावर जॅकी श्रॉफ आणि सुभाष घई यांनी एकाच मुद्द्यावर भर दिला—चांगला माणूस होणं हेच करिअर आणि आयुष्याची खरी सुरुवात आहे.

सुभाष घई यांनी आपल्या तत्त्वज्ञानपूर्ण शैलीत सांगितले, “माणूस ज्ञानाने नव्हे तर आत्म्याच्या स्वच्छतेने इतरांना आकर्षित करतो.”

जरी हा संवाद सत्र मूळतः बॉलीवुडविषयी असणार होतं, तरी दोघांची चर्चा हळूहळू जीवनातील मूल्यं, अनुभव आणि मानवी संवेदनांवरील अनमोल शिकवणीत रूपांतरित झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर उमटलेला आनंद आणि प्रेरणा स्पष्ट सांगत होती की हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.

‘आवर्तन 2025’च्या अंतिम दिवशी झालेले हे सत्र दाखवून गेले की भारतातील मनोरंजन, मीडीया आणि बिझनेस — हे तीनही क्षेत्र एकत्रित ऊर्जेने आणि नव्या शक्यतांसह पुढे जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande