अकोला- बकरी चोरी प्रकरणाचा 12 तासात छडा, आरोपी अटकेत
अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)।ऑपरेशन प्रहार अंतर्गत डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत बकरी चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध लावून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर प्रकरणात फिर्यादी यांनी १४ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस
H


अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)।ऑपरेशन प्रहार अंतर्गत डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत बकरी चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध लावून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर प्रकरणात फिर्यादी यांनी १४ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे तक्रार नोंदवली होती की, त्यांच्या तसेच शेजाऱ्यांच्या एकूण तीन बकऱ्या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी गेल्यानंतर घरी परतल्या नव्हत्या. आजूबाजूचा परिसर आणि शहरात शोध घेतल्यानंतरही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे सुमारे २८ हजार रुपये किंमतीच्या तीन बकऱ्या अज्ञात इसमांनी चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. कलम ३०३ (२) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील नायक पोलीस कॉन्स्टेबल राजेश ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गिते यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. ठाणेदार दीपक कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित इसम मोहम्मद शाबाज मोहम्मद आरीफ, अफजल खान अब्दुल खलील खान यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल म्हणजे तीन बकऱ्या, अंदाजे किंमत २८ हजार दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande