ग्राईंडर मशीन परत मागितल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली
नाशिक, 15 डिसेंबर (हिं.स.)। - ग्राईंडर मशीन परत मागितल्याचा राग आल्याने एका दुचाकी पेटविल्याची घटना गंजमाळ परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी महंमद रेहान सय्यद (वय ३६, रा. गंजमाळ, नाशिक) याचे ग्राईंडर मशीन आरोपी वा
ग्राईंडर मशीन परत मागितल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली


नाशिक, 15 डिसेंबर (हिं.स.)।

- ग्राईंडर मशीन परत मागितल्याचा राग आल्याने एका दुचाकी पेटविल्याची घटना गंजमाळ परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी महंमद रेहान सय्यद (वय ३६, रा. गंजमाळ, नाशिक) याचे ग्राईंडर मशीन आरोपी वाजिद जयेद शेख (रा. म्हाडा बिल्डिंगजवळ, वडाळा) याने घेतले होते. महंमदने ते ग्राईंडर मशीन वाजिदकडे परत मागितले.

या गोष्टीचा राग मनात धरून दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास महंमद सय्यदने त्याच्या घरासमोर उभी केलेली एमएच १५ जेई ११८ या क्रमांकाची अॅक्सेस दुचाकी वाजिदने पेटवून देऊन गाडीचे नुकसान केले. या प्रकरणी महंमद सय्यद यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande