जळगावात बंद घर फोडून ४९३०० रुपयांचा ऐवज चोरीला
जळगाव , 15 डिसेंबर (हिं.स.) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्
जळगावात बंद घर फोडून ४९३०० रुपयांचा ऐवज चोरीला


जळगाव , 15 डिसेंबर (हिं.स.) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरीफ मुराद खाटीक (वय ५२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचे घर १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट उघडून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य साहित्य असा ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला. घर उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande