सरदार पटेलांचे जीवन आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी एक विशेष प्रेरणा - पंतप्रधान
नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भ
सरदार पटेलांचे जीवन आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी एक विशेष प्रेरणा - पंतप्रधान


नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.

एकात्म आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सरदार पटेलांचे अतुलनीय योगदान समस्त देशवासियांच्या स्मरणात सदैव कोरलेले राहील, असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी असेही म्हटले की, 'आत्मनिर्भर भारता'च्या उभारणीसाठी सरदार पटेलांचे जीवन आजही विशेष प्रेरणा देत आहे. भारताच्या या लोहपुरुषाने रुजवलेली राष्ट्रीय एकतेची भावना 'विकसित भारता'च्या संकल्पनेसाठी ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रनिर्मितीतील सरदार पटेलांचे अतुलनीय योगदान, त्यांचे निर्णायक नेतृत्व आणि भारताची अखंडता बळकट करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता, एका सशक्त आणि समर्थ राष्ट्रासाठी सदैव मार्गदर्शक ठरेल, असे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.

एक्सवरील स्वतंत्र पोस्ट्समध्ये मोदी यांनी नमूद केलेः

“ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या 75व्या पुण्यतिथी दिनी माझे सादर नमन. त्यांनी देशाला एका सूत्रात गुंफण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. एकसंध आणि सशक्त भारतवर्षाच्या निर्मितीमध्ये त्यांचे अतुलनीय योगदान हे कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरणार नाही.”

“भारत रत्न सरदार पटेल यांची 75वीं पुण्यतिथी आत्मनिर्भर भारतासाठी प्रेरणा घेण्यासाठी एक विशेष प्रसंग देखील आहे. त्यांनी देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकतेची जी भावना रुजवली, ती ‘विकसित भारत’ साठी ऊर्जेचा स्रोत आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांची अद्वितीय भूमिका सशक्त आणि सामर्थ्यवान भारतासाठी मार्गदर्शक बनेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande