मणिपूरमध्ये 2.9 तीव्रतेचा भूकंप
इंफाल,19 डिसेंबर (हिं.स.) : मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री 2.9 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 2.58 वाजता झाला. भूकंपाची खोली सुमारे 35 किल
भूकंप लोगो


इंफाल,19 डिसेंबर (हिं.स.) : मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री 2.9 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 2.58 वाजता झाला. भूकंपाची खोली सुमारे 35 किलोमीटर होती. भूकंपाचे केंद्र 25.19 अंश उत्तर अक्षांश आणि 94.22 अंश पूर्व रेखांशावर असलेल्या उखरूल परिसरात होते.

भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही, मात्र नागरिकांना धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी गुरुवारी म्यानमारमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याची खोली 100 किलोमीटर होती. तसेच बुधवारी उशिरा रात्री तिबेटमध्ये 3.8 तीव्रतेचा आणि मंगळवारी रात्री लडाखच्या लेह भागात 3.4 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता.तज्ज्ञांच्या मते हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असल्यामुळे सातत्याने सौम्य भूकंपांचे धक्के जाणवत आहेत.---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande