
रत्नागिरी, 2 डिसेंबर, (हिं. स.) : मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या बळावर गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय (मांडकी-पालवण, ता. चिपळूण) येथील 13 युवा खेळाडूंची आगामी 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात येत्या 4 ते 8 डिसेंबर या कालावधी ही स्पर्धा होणार आहे. त्याकरिता झालेल्या निवड चाचणीमध्ये गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आठ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवासाठी त्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे अशी - आदित्य पाटील, शुभम कोळेकर, यश माने, यदनेश वामणे, देवराज पवार, प्रज्ञा गोठणकर, सोनल शिंदे, अमोल कोळेकर, वैष्णवी माने, ओंकार पाटील, प्रणव पाटील, आकाश वाडिया, आदित्य तांबेकर.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी