छ. संभाजीनगर - टकसाळी लॉन्स येथे आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबर, (हिं.स.)। कोकणवाडी चौक येथील टकसाळी लॉन्स येथे युगंधर सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देतांना सर्व डॉक्टरांश
अ


छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबर, (हिं.स.)। कोकणवाडी चौक येथील टकसाळी लॉन्स येथे युगंधर सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देतांना सर्व डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. नागरिकांना उत्तम, दर्जेदार आणि सहज उपलब्ध आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच निरोगी समाजनिर्मितीस हातभार लागू शकेल, याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली व अनेकांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमासाठी आपला वेळ, प्रयत्न आणि सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे तसेच उपस्थित राहून सहभाग नोंदवलेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळेच अशा उपक्रमांना अधिक बळ मिळते आणि समाजात आरोग्य जागरूकता वाढण्यास मदत होते, असे पालकमंत्री शिरसाट म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande