बाजार समितीतील बालाजी फूड ट्रेडर्स वर अन्न व औषध प्रशासनाचा छापा
नाशिक, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। - शरदचंद्र पवार मार्केट मधील बालाजी फुड ट्रेडर्स या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये सुमारे तीन लाख रुपयाचा हळद व तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत त
Food and Drug Administration


नाशिक, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। - शरदचंद्र पवार मार्केट मधील बालाजी फुड ट्रेडर्स या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये सुमारे तीन लाख रुपयाचा हळद व तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत तसेच येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांच्या दृष्टीने विविध अन्न पदार्थाबाबत मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसारच मे. श्री बालाजी फुट ट्रेडर्स, शॉप न. ६७ , शरदचंद्र मार्केट, पेठ रोड, पंचवटी या ठिकाणाहून. वातुला ब्रेडचे गाईचे तूप या अन्न पदार्थाचा ७५ कि. ग्रॅ. किंमत रु. ५६ हजार २०० रुपये किंमतीची हळद पावडर या अन्न पदार्थाचा ९०० कि. ग्रॅ. किंमत रु. २लाख ४५ हजार ७०० अशा प्रकारे दोन्ही अन्न पदार्थाची एकूण किंमत रु.३लाख ०१,व हजार ९०० रुपये इतका साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सह आयुक्त मंगेश माने , सहाय्यक आयुक्त . ज्ञानेश्वर महाले, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, यांनी केली आहे. अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास किंवा भेसळयुक्त / असुरक्षित अन्नपदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे https://complaints.mahafda.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे तपासणी दरम्यान अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने तपासणी करण्यात येत आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande