ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीला मुकणार
सिडनी, २ डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीला मुकणार आहे. पर्थमधील पहिल्या कसोटीदरम्यान, ख्वाजा पाठीच्या दुखापतीमुळे दोन्ही डावात फलंदाजी करू शकला नाही. सोमवारी ग
उस्मान ख्वाजा


सिडनी, २ डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीला मुकणार आहे. पर्थमधील पहिल्या कसोटीदरम्यान, ख्वाजा पाठीच्या दुखापतीमुळे दोन्ही डावात फलंदाजी करू शकला नाही. सोमवारी गॅब्बा येथे नेट सराव करताना त्याला अस्वस्थता जाणवली, ज्यामळे त्याला दुसऱ्या कसोटीत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामनापूर्व पत्रकार परिषदेत वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड म्हणाला, हे कठीण आहे कारण त्याने गेल्या सामन्यापासून आपल्या तंदुरुस्तीवर सातत्याने काम केले आहे. पण दुर्दैवाने, तो पूर्णपणे तयार झालेला नाही. तो नेटमध्ये ठीक दिसत होता, पण कदाचित त्याला वाटले की, तो खेळण्यास तयार नाही.

उस्मान ख्वाजाच्या जागी कोणत्याही नवीन क्रिकेटपटूचा समावेश केला जाणार नाही. अशा परिस्थितीत, पर्थमध्ये १२३ धावांची शानदार खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्याची शक्यता वाढली आहे.

बोलंड म्हणाला, मला मधल्या फळीबद्दल खात्री नाही, पण मला आशा आहे की, ट्रॅव्हिस हेड ओपनिंग करेल. आमच्या संघाची ताकद अशी आहे की जेव्हा जेव्हा एखादा क्रिकेटपटू बाद होतो तेव्हा दुसरा क्रिकेटपटू पुढे येतो आणि जबाबदारी घेतो.

डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर गेल्या दोन वर्षांत मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डावाची सुरुवात केली आहे. पण लाबुशेनने स्पष्ट केले की, तो यावेळी असे करणार नाही.

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ:

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलंड, अ‍ॅलेक्स केरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, मिशेल स्टार्क, जेक वेदरल्ड, ब्यू वेबस्टर.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande