पुणे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘संगीतमय तिकीटे’ प्रदर्शन
पुणे, 2 डिसेंबर (हिं.स.)अभिजात संगीताच्या मैफलीमध्ये स्वरमंचावरून सादर होणाऱ्या अभंग आणि भजनांमध्ये आपल्या टाळवादनाने अनोखे रंग भरत कलाकारांच्या चार पिढ्यांना साथसंगत करणारे अवघ्या ९९ वर्षांचे चिरतरुण माऊली टाकळकर यांना यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्क
पुणे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘संगीतमय तिकीटे’ प्रदर्शन


पुणे, 2 डिसेंबर (हिं.स.)अभिजात संगीताच्या मैफलीमध्ये स्वरमंचावरून सादर होणाऱ्या अभंग आणि भजनांमध्ये आपल्या टाळवादनाने अनोखे रंग भरत कलाकारांच्या चार पिढ्यांना साथसंगत करणारे अवघ्या ९९ वर्षांचे चिरतरुण माऊली टाकळकर यांना यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या संकल्पनेतून ‘संगीतमय तिकीटे’ (म्युझिकल स्टॅम्प्स) हे विशेष प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकार आणि साथसंगतकारांना २००७ पासून आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. ५१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १० ते १४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande