मनपा निवडणुकांत पैशांच्या गैरवापरावर आयकर विभागाची 24x7 नजर
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रात होणाऱ्या 2025–26 मधील आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या ताकदीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मुंबई आयकर विभागाने 24x7 कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुक्त व निष्पक्ष वातावरणात निव
Income Tax Department


मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रात होणाऱ्या 2025–26 मधील आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या ताकदीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मुंबई आयकर विभागाने 24x7 कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची शुचिता कायम राखण्याच्या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष आयकर विभागाच्या निवडणूक निरीक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून कार्य करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील.

हा नियंत्रण कक्ष राज्यातील जागरूक नागरिक व रहिवाशांना निवडणूक प्रचारादरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांच्या वापराबाबत माहिती देऊन सावधान करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नागरिक व्हॉट्सॲप, मोबाईल संदेश किंवा दूरध्वनीद्वारे 7738113758या क्रमांकावर अथवा

mumbai.addldit.inv8@incometax.gov.in या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवू शकतात. हा नियंत्रण कक्ष, कक्ष क्रमांक 316, तिसरा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 इथे आहे. पैशांच्या ताकदीचा गैरवापर रोखण्यासाठी विश्वासार्ह माहितीसंदर्भात तातडीने व प्रभावी कारवाई करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा मुंबई आयकर विभागाने पुनरुच्चार केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande