
नवी दिल्ली, 26 डिसेंबर, (हिं.स.)। शिखांचे दहावे गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या अतुलनीय शौर्याचे व बलिदानाचे प्रतीक असलेल्या वीर बाल दिवसानिमित्त कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, संचालक (माहिती) हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या अविस्मरणीय बलिदानाचा परिचय करून दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर