
नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.) -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 30 डिसेंबर दरम्यान गोवा, कर्नाटक आणि झारखंड राज्यांना भेट देणार आहेत. 27 डिसेंबरच्या संध्याकाळी त्या गोव्यासाठी रवाना होतील.
28 डिसेंबर रोजी, राष्ट्रपती कर्नाटकच्या कारवार बंदरातून पाणबुडीतून सागरी सफर करतील.
29 डिसेंबर रोजी, राष्ट्रपती झारखंडमधील जमशेदपूर येथे ‘ओल चिकी’च्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहून आयोजनाची शोभा वाढवतील. त्याच दिवशी, त्या जमशेदपूर येथील एनआयटी च्या 15 व्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करतील.
30 डिसेंबर रोजी त्या झारखंडमधील गुमला येथे 'आंतरराज्यीय जनसांस्कृतिक समागम समारोह – कार्तिक यात्रा' या कार्यक्रमाला संबोधित करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी