केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून अरुण जेटलींच्या जयंतीनिमित्त स्मरण
नवी दिल्ली, 28 डिसेंबर (हिं.स.) - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले. सामाजिक संपर्क माध्यम ‘X’ वरील संदेशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून अरुण जेटलींच्या जयंतीनिमित्त स्मरण


नवी दिल्ली, 28 डिसेंबर (हिं.स.) - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले.

सामाजिक संपर्क माध्यम ‘X’ वरील संदेशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. अद्वितीय संविधानिक व कायदेविषयक तज्ज्ञ आणि उत्कृष्ट वक्ते असलेले जेटली यांनी संसदपटू म्हणून अमिट वारसा सोडला असून अनेक ऐतिहासिक कायदेशीर विषयांतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाईल. आपल्या तीक्ष्ण कायदेविषयक कौशल्याच्या जोरावर पक्ष बळकट करण्यामधील त्यांची समर्पित भूमिका काळाच्या प्रत्येक कसोटीवर टिकून राहील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande