भारतात मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ९७ टक्के घट
देश लवकरच मलेरिया आजारापासून मुक्त होईल - अमित शाह अहमदाबाद, 28 डिसेंबर (हिं.स.)।केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत 97 टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधी
मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ९७% घट, भारत लवकरच मलेरिया आजारापासून मुक्त होईल- अमित शाह


देश लवकरच मलेरिया आजारापासून मुक्त होईल - अमित शाह

अहमदाबाद, 28 डिसेंबर (हिं.स.)।केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत 97 टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधील शेला येथे आयोजित भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) च्या परिषदेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मिशन इंद्रधनुष यांसारख्या आरोग्य योजनांमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

अमित शाह यांनी सांगितले की, डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूदरात घट होऊन तो आता केवळ 1 टक्का राहिला आहे, तर मातृ मृत्यूदरात 25 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यांनी माहिती दिली की, 2014 साली केंद्र सरकारचा आरोग्य अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपये होता, जो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाढून 1.28 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

शाह म्हणाले की, योजना जमीनी पातळीवर प्रभावीपणे राबवल्या गेल्या तरच अशा यशस्वी उपलब्धी साध्य होतात आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टरांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या प्रयत्नांना सरकारच्या आरोग्य योजना आणि पायाभूत सुविधांशी जोडले पाहिजे, जेणेकरून अधिक चांगले परिणाम साधता येतील. त्यांनी स्पष्ट केले की, ‘विकसित भारत 2047’ हे लक्ष्य गाठण्यासाठी देशाला निरोगी लोकसंख्येची आवश्यकता असून यात डॉक्टर आणि आयएमए यांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

ते म्हणाले की, 2014 पासून केंद्र सरकार समग्र दृष्टिकोनातून मजबूत आरोग्य व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत, फिट इंडिया चळवळ आणि खेलो इंडिया यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने जेनेरिक औषधे स्वस्त केली, अनेक औषधांवरील जीएसटी हटवला आणि वैद्यकीय शिक्षणातील जागांची संख्या वाढवली आहे.त्यांनी पुढे सांगितले की, एम्सचा विस्तार करण्यात येत असून, आगामी काळात एम्सच्या माध्यमातून टेलीमेडिसिन आणि व्हिडिओद्वारे प्राथमिक व सामुदायिक आरोग्य केंद्रांना मार्गदर्शन देण्याचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमित शाह यांनी आयएमएला आवाहन केले की, स्वस्त, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवांच्या दिशेने आपल्या योगदानाचा पुनर्विचार करावा. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षणामध्ये नैतिकतेचा समावेश करणे अत्यावश्यक असून यामध्ये आयएमए ची महत्त्वाची जबाबदारी आहे.

तसेच, आयएमए ने अशा डॉक्टरांची यादी तयार करावी, जे टेलीमेडिसिनच्या माध्यमातून दररोज किमान तीन तास गरजू रुग्णांना स्वेच्छेने वैद्यकीय सल्ला देण्यास तयार असतील, अशी सूचनाही त्यांनी केली. अमित शाह यांनी डॉक्टरांना सांगितले की, आज केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा ‘कल्याण’ (वेलनेस) या संकल्पनेचा स्वीकार करणे गरजेचे आहे. औषधांसोबतच रुग्णांना जीवनशैलीतील बदल आणि चांगल्या सवयींबाबतही मार्गदर्शन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande