पाकिस्तानच्या टिप्पणीवर भारताचे कडक प्रत्युत्तर
अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर मांडली स्पष्ट भूमिका नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.)। भारतात ख्रिसमसदरम्यान घडलेल्या काही तुरळक तोडफोडीच्या घटनांवर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्यांवर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक
रणधीर जयस्वाल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता


अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.)। भारतात ख्रिसमसदरम्यान घडलेल्या काही तुरळक तोडफोडीच्या घटनांवर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्यांवर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, ज्या देशाचा अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबतचा इतिहास स्वतःच सर्व काही सांगतो, अशा देशाच्या टिप्पणी स्वीकारार्ह नाहीत.

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये विविध धर्मांच्या अल्पसंख्याकांविरुद्ध होणारा भीषण आणि सुनियोजित छळ हा सर्वविदित वास्तव आहे, जो आरोप-प्रत्यारोप करून लपवता येणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे एक हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींच्या अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाहाच्या घटना समोर येतात. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची स्थिती दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय मंचांवर चिंतेचा विषय राहिली आहे. अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर, तसेच ईशनिंदेच्या आरोपांखाली हिंसा आणि हत्या यांसारख्या घटना वारंवार नोंदवल्या जात आहेत.

उल्लेखनीय म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी भारतात अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लीम समुदायावर हिंसा होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. तसेच पाकिस्तानने भारताला अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलण्याचा सल्ला दिला होता.भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानकडून लावण्यात आलेले आरोप निराधार आणि कल्पनाविलासी आहेत. अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर उपदेश देण्यापूर्वी पाकिस्तानने आपल्या अंतर्गत परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असेही भारताने सांगितले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande