तरोडा फाटा येथे शेख फारुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,रक्तदान शिबिरात १३ जणांनी रक्तदान
परभणी, 3 डिसेंबर (हिं.स.)। शेख फारुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज तरोडा फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, एकूण १३ जणांनी
रक्तदान शिबिरात १३ जणांनी रक्तदान


परभणी, 3 डिसेंबर (हिं.स.)।

शेख फारुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज तरोडा फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, एकूण १३ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

नवयुवक मित्र मंडळ, तरोडा फाटा यांच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून आरोग्यवर्धक उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्ष राजू सय्यद, परभणी बाजार समिती संचालक विलासराव बाबर, जिजाऊ ब्लड बँक संचालक अमोल अवकाळे, माजी पंचायत समिती सदस्य अंगद सोगे, गावचे सरपंच मुरलीराव शेळके, तटांमुक्ती अध्यक्ष अजय गाडगे, शाळेचे मुख्याध्यापक अंधारे सर, डॉ. फारुख सर, सय्यद अकबर, सय्यद रियाज, अहमद पटेल यांसह नवयुवक मित्र मंडळातील सर्व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवयुवक मित्र मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव, आरोग्य संवर्धन आणि विद्यार्थी कल्याणासाठी उपयुक्त ठरला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande