
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री.श्रीराम बाबा शेळके यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगरच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. सभापती पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना आमदार अनुराधा चव्हाण यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ठरलेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानुसार श्री.राधाकिसन बापू पठाडे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, सर्व सन्माननीय संचालक मंडळाने एकमताने श्रीराम बाबा शेळके यांच्यावर विश्वास टाकत ही निवड केली.
शेतकरी हिताचा ध्यास, पारदर्शक कारभार आणि विकासाभिमुख निर्णयांच्या माध्यमातून बाजार समितीची पुढील वाटचाल अधिक भक्कम होईल, असा विश्वास आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल, यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis