परभणीत भाजप - सेना युती तुटली; स्थानिक भाजप नेत्यांनी युती तोडल्याचा शिवसेनेचा आरोप
परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये मागील चार - पाच दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठका झाल्या. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी युती
परभणीत भाजप - सेना युती तुटली -  स्थानिक भाजप नेत्यांनी युती तोडल्याचा शिवसेनेचा आरोप


परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये मागील चार - पाच दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठका झाल्या. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी शिवसेना महानगराध्यक्ष माणिक पौंढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, प्रवीण देशमुख, डॉ. धर्मराज चव्हाण आदींची उपस्थिती होती. परभणीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासोबत झालेल्या बैठकीत १३:२० अशी जागा वाटपाची बोलणी झाली असताना अचानक काही अधिकच्या जागांची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. शिवसेना नेते उदय सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीने युती झाली असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ठरलेल्या जागावाटप सूत्रापेक्षा ऐनवेळी अधिकच्या जागांची मागणी केल्याने तसेच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा अंतिम शब्द असतानाही अधिकच्या जागेची मागणी केल्याने युती फिस्कटल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केला. स्थानिक भाजप नेत्यांना आपल्या संपर्कातील आणि घरगड्यांना उमेदवारी देण्यासाठी ही भाजप - सेना युती तोडल्याचेही सांगितले. एवढेच नाही तर भाजप महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची आघाडी आणि काँग्रेस पक्षाशी देखील संपर्क साधून असल्याचा गंभीर आरोप त्यावेळी भरोसे यांनी केला. असे असले तरी शिवसेना होऊ घातलेल्या परभणी महापालिका निवडणुकीत आपले सर्व उमेदवार विजयी करेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande