
नवी दिल्ली, 8 डिसेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघाला घराच्या मैदानावर सलग दोन कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून संघाची सुरुवात चांगली झाली होती. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी घसरली आहे. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, पराभवाचा दोष केवळ प्रशिक्षकावर टाकणे चुकीचे आहे. क्रिकेटपटूंनीही पुढे येणे गरजेचे आहे.
शास्त्री म्हणाले, जेव्हा निकाल खराब असतात तेव्हा क्रिकेटपटूंनीही पाऊल उचलले पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे. फक्त प्रशिक्षकाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. माझ्या काळात हे घडले आहे, म्हणून मी अनुभवावरून बोलत आहे. क्रिकेटपटूंना पराभवाचे दुःख जाणवले पाहिजे. तेव्हाच बदल घडतील. प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. अपयशामुळे प्रश्न निर्माण होतील.त्यांनी सांगितले की क्रिकेट हा ९०% मनाचा खेळ आहे आणि संघ मानसिकदृष्ट्या मजबूत असला पाहिजे.
शास्त्री पुढे म्हणाले की प्रशिक्षण हे केवळ रणनीतीपुरते मर्यादित नाही. कोचिंगमध्ये संयम, संवाद आणि मनुष्यबळ व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडूंशी योग्य पद्धतीने कसे संवाद साधायचा हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही त्यांना प्रेरित करू शकता. मुख्य प्रशिक्षकावर नेहमीच दबाव असेल, म्हणून संतुलन आवश्यक आहे.त्यांनी असेही म्हटले की संघाचा पराभव नेहमीच सामूहिक असतो. संघ व्यवस्थापनापासून क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण जबाबदार असतात.
गौतम गंभीर यांनी यापूर्वी अनेक वेळा शास्त्रींवर टीका केली आहे. २०२१ मध्ये एका व मुलाखतीत गंभीर यांनी शास्त्री यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. ज्यामध्ये त्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला जगातील सर्वोत्तम कसोटी संघ म्हटले होते. शास्त्री यांनी १९८३ च्या विश्वचषक विजयाची तुलना ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील विजयाशी केली होती, ज्यावर गंभीरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे