'छावा' चित्रपट पाहून आकाश चोप्राने सोशल मीडियावर मांडले आपले प्रश्न
मुंबई , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।सध्या बॉलीवूडचा 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सिनेमा गृहांमध्ये गर्दी केली आहे. छावा सिनेमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चार दिवसांमध्ये या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे
Chhava movie


मुंबई , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।सध्या बॉलीवूडचा 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सिनेमा गृहांमध्ये गर्दी केली आहे. छावा सिनेमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चार दिवसांमध्ये या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता भारताची माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने छावा चित्रपटावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत हे त्याने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले आहेत.

छावा' चित्रपट पाहिल्यानंतर, क्रिकेटरमधून समालोचक बनलेले आकाश चोप्रा यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची एक अविश्वसनीय कहाणी. खरा प्रश्न - शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल का शिकवले गेले नाही? त्यांचा कुठेही उल्लेख नाही. तथापि, आपण वाचले आहे की अकबर एक महान आणि न्यायी सम्राट होता आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक अतिशय प्रसिद्ध रस्ता देखील आहे हे का आणि कसे घडले?

'छावा' हा चित्रपट 'छावा' नावाच्या पुस्तकापासून प्रेरित आहे, ज्यामध्ये भारतातील महान योद्ध्यांपैकी एक असलेले छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अक्षय खन्ना देखील आहेत, जो मुख्य प्रतिस्पर्धी म्हणजेच मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारतो. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी आणि विनीत कुमार सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande