'वॉर-२' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत
मुंबई , 11 मार्च (हिं.स.)।वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हृतिक रोशन त्याच्या या आगामी चित्रपट वॉर-२ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान या चित्रपटातील एका
Hrutik roshn


मुंबई , 11 मार्च (हिं.स.)।वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हृतिक रोशन त्याच्या या आगामी चित्रपट वॉर-२ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान या चित्रपटातील एका गाण्यातील सीनचं शूटिंग करताना अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे हृतिकचे चाहतेदे खील चिंतेत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, वॉर-२ मधील एका गाण्याचं शूट करत असताना हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे गाण्याचं शूटिंग थांबवण्यात आलं असून आता हे शूटिंग मे महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे.हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी देखील प्रमुख भूमिकेत आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande