दुबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)।आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचे वडील अल्बर्ट मॉर्केल यांचे निधन झाले आहे.या बातमीमुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली. आता माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल हा दुबईहून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी दुबईमध्ये सराव करत आहे.
मॉर्नी मॉर्केलचे वडील अल्बर्ट हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांना दक्षिण आफ्रिकेत लिस्ट ए मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. अल्बर्ट हे 74 वर्षांचे होते. एल्बी मोर्केल आणि मालक मोर्केल असे दोन मॉर्नी मॉर्केलला भाऊ आहेत. एल्बी मोर्केल आणि मिलन मोर्केल हा देखील दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळलेला आहे. एल्बी ला 1 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. तो दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तर मिलन मोर्केलने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले.
15 फेब्रुवारीला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेसाठी दुबईला पोहोचला तेव्हापासून मॉर्केल संघासोबत होता. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तो गेल्या वर्षी संघात सामील झाला होता. त्याने माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांची जागा घेतली होती. पारस यांचा कार्यकाळ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपला. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाच्यागोलंदाजीच्या कामगिरीवर मॉर्केल याच्यावर टीका झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode