नाशिक, 4 फेब्रुवारी (हिं.स.)। बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच विविध शासकीय आस्थापनांतील कर्मचारी यांच्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित क्रिकेट प्रीमियर लीगचा दुसरा सीझन ३० व ३१ जानेवारी रोजी घेण्यात आला. यामध्ये बागड प्रॉपर्टीजच्या संघाने विजेतेपद मिळवले. श्रीयोग रॉयल्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
नाशिक शहर पोलीस, लॅण्ड रेकॉर्ड ऑफिस, नाशिक महानगरपालिका, टाउन प्लॅनिंग, विभागीय आयुक्त कार्यालय, टीएलआर आदी शासकीय आस्थापनांच्या संघांचादेखील समावेश होता. लीगचा शुभारंभ १९ वर्षांखालील भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा खेळाडू साहिल पारिख, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, उपक्रमाचे समन्वयक अंजन भालोदिया व सहसमन्वयक शिवम पटेल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे सहसचिव अनिल आहेर, ऋषिकेश कोते, तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य सुशील बागड व अजय राका यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेत एकूण २१ संघ सहभागी झाले होते. त्यात श्रीजी ग्रुप, श्री हरिकृष्ण डेव्हलपर्स, ठक्कर डेव्हलपर्स, हरि ओम ग्रुप, बागड प्रॉपर्टीज्, हर्षल हणमंते बिल्डर्स, मालपुरे ग्रुप, ग्रीन स्पेसेस, पार्कसाइड, अर्चित ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सुप्रीम फॉरच्युन डेव्हलपर्स, श्रीयोग बिल्डर्स, एबीएच डेव्हलपर्स, अॅव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ग्लॅडिएटर्स प्राण या संघांचा समावेश होता
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI