लिओनेल मेस्सीची बहीण मारिया सोल कार अपघातात जखमी
मियामी, 24 डिसेंबर (हिं.स.)अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची बहीण मारिया सोल मियामीमध्ये एका गंभीर कार अपघातात जखमी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जानेवारीच्या सुरुवातीला होणारा तिचा लग्नाचा कार्यक्रम पुढे
लिओनेल मेस्सीची बहीण मारिया सोल कार अपघातात जखमी


मियामी, 24 डिसेंबर (हिं.स.)अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची बहीण मारिया सोल मियामीमध्ये एका गंभीर कार अपघातात जखमी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जानेवारीच्या सुरुवातीला होणारा तिचा लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. ३२ वर्षीय मारियाला या अपघातात अनेक दुखापती झाल्या आहेत. ज्यामध्ये पाठीचा कणा फ्रॅक्चर आणि घोट्याला आणि मनगटाला फ्रॅक्चरचा समावेश आहे.

मेस्सीची आई सेलिया कुचीटिनी यांनी पुष्टी केली की, मारिया सोल आता धोक्याबाहेर आहे. पण तिला व्यापक पुनर्वसनाची आवश्यकता आहे. ती ठीक आहे आणि धोक्याबाहेर आहे, परंतु तिचा ३ जानेवारी रोजी रोसारियोमध्ये होणारा विवाह पुढे ढकलावा लागेल. तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिच्या पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली आहे.मारिया सोलचे ३ जानेवारी रोजी तिच्या मूळ गावी रोसारियो येथे इंटर मियामी सीएफच्या १९ वर्षांखालील प्रशिक्षक संघातील सदस्य ज्युलिन तुली अरेलानोशी लग्न होणार होते. ती पूर्णपणे बरी होईपर्यंत लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande