पुणे : महापालिकेच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्री करणार लोकार्पण
पुणे, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजनतसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते६ फेब्रुवारी २०२५ र
Cm news fro pune today


पुणे, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजनतसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील,क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande