मनपा नगररचना विभागातील मलिदा कर्मचारी गँगवर कारवाई करण्याची मागणी
अहिल्यानगर, दि. 5 फेब्रुवारी (हिं.स.) :- शहर विकासात नगर रचना विभागाचा खोडा निर्माण झाला असून नगररचना विभागातील मलिदा कर्मचारी गँगवर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.
मनपा नगररचना विभागातील मलिदा कर्मचारी गँगवर कारवाई करावी


अहिल्यानगर, दि. 5 फेब्रुवारी (हिं.स.) :- शहर विकासात नगर रचना विभागाचा खोडा निर्माण झाला असून नगररचना विभागातील मलिदा कर्मचारी गँगवर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.

नगर शहरातील तपोवन रोड हॉटेल राजनंदिनी,एकविरा चौक ते पारिजात चौक,राजनंदिनी ते लेखानगर मार्गे,सरस्वती शाळा ते तलाठी कार्यालय ते बंधन लॉन ते नगर मनमाड रोडच्या माकींग व रोडचे काम चालू करण्या बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून आपणास व पालिका अधिका-यांशी अनेकदा पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम होत नाही.या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला असून देखील सदरील काम चालू नाही.काम चालू नसल्याचे कारण ठेकेदाराला विचारल्यास आम्हाला रोड मार्किंग मिळाली नाही.रस्त्याची वर्क ऑर्डर होवून अनेक महिने गेले. तरी देखील अजुन रोड मार्कंग मिळत नाही.शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या माझ्या प्रभागात डीपी रस्त्यांची कामे मंजूर असून ती मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित पडली आहे.ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मॉडेल रस्ते म्हणून ओळखले जातील.मात्र याचे सोयरसुतक या अधिकाऱ्यांना नाही, अशी भावना मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.

निवेदनात संपत बारस्कर यांनी म्हंटले आहे की,की मला असे वाटते नगररचना विभाग हा पूर्णपणे पैसे वसूली च्या मागे आहे.महानगरपालिकेत बांधकाम व्यावसा यिक आला किंवा एखादयाने घर बांधायला काढले.त्यांनी त्यांचे घर रूपया-रूपया गोळा करून एक किंवा अर्घा गुंठा जागा घेवून,आपल्या मुला बाळांना व आपला संसार उभा करणे साठी कर्ज घेवून घरच्यांचे सोने गहाण ठेवून घर बांधतात हे नगररचना विभागातील लोक फक्त या लोकांकडून पैसे उकळण्यात व्यस्त आहेत.एकाच जागेवर अनेक वर्ष हे लोक काम कसे करतात.जरी बदली झाली की पुन्हा कसे परत लगेच येतात,हा मोठा प्रश्न आहे.या कामामुळे या अधिका-यांकडे शहर विकास कामासाठी वेळ नाही.कारण तेथे यांना मलिदा म्हणजेच पैसे भेटत नाही.अशा लोकांच्या तातडीने या विभागातून बदली करण्यात याव्यात.व सदरील प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना संपत बारस्कर यांनी निवेदनातून दिला आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande