वसंतराव नाईक विकास महामंडळ कर्ज योजना ;   नागरिकांनी अफवांना बळी पडू नये
सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो असे सांगुन रोख रक्कमेची मागणी केली जात आहे. महामंडळ
वसंतराव नाईक विकास महामंडळ कर्ज योजना ;   नागरिकांनी अफवांना बळी पडू नये


सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून कर्ज मिळवून देतो असे सांगुन रोख रक्कमेची मागणी केली जात आहे. महामंडळामार्फत कोणत्याही एजंट अथवा मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. नागरिकांनी सदर अफवांना बळी पडून कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक देवाण घेवाण करू नये, असे आवाहन वसंतराव नाईक विकास महामंडळकडून करण्यात आले आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय - सोलापूर या महामंडळाकडून 10 लाख रुपये कर्ज मिळवून देतो म्हणून जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील लोकांकडून काही रोख रक्कमेची मागणी केली जात आहे व तद्नंतर आठ दिवसामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयाचे कर्ज मिळणार व त्यामधील दोन ते तीन लाख रूपये वरिष्ठ अधिकारी यांना द्यावे लागतील. व सदर कर्जाची तुम्हाला परतफेड करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणून जिल्ह्यामध्ये काही तोतया व्यक्तींनी लोकांनाकडून पैसे घेऊन फसवणूक करीत असल्याच्या तोंडी तक्रारी वसंतराव नाईक विकास महामंडळ, सोलापूर या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande