सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. लाभार्थ्यांचं ई-केवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी करावी. ई-केवायसी केले नाही, तर दिनांक 15 फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्प चा लाभ घ्यावा. या संदर्भात सर्व लाभार्थीं व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दिनांक 15 फेब्रुवारीपुर्वी 100 टक्के कामकाज पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड