वनुआतुच्या पंतप्रधानांकडून ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश
पोर्ट-विला, 10 मार्च (हिं.स.)।आयपीएलचे माजी प्रशासक ललित मोदी यांचा वानुअतू देशाच्या पंतप्रधानांनी पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ललित मोदी यांच्याकडे वानुअतूचे नागरकत्व असून त्यांनी अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला होता. वानुआतू
Lalit modi


पोर्ट-विला, 10 मार्च (हिं.स.)।आयपीएलचे माजी प्रशासक ललित मोदी यांचा वानुअतू देशाच्या पंतप्रधानांनी पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ललित मोदी यांच्याकडे वानुअतूचे नागरकत्व असून त्यांनी अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला होता. वानुआतूच्या स्थानिक वर्तमानपत्राने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये यासंबंधी माहिती दिली.

अहवालानुसार, ललित मोदीचा वानुआतू पासपोर्ट रद्द करण्यात न्यूझीलंडमधील भारताच्या उच्चायुक्त नीता भूषण यांनी इतर काही बेट देशांसह महत्त्वाची भूमिका बजावत वानुआतू देशाचा मोदींचा पासपोर्ट रद्द केला.ललित मोदी हा एक फरार भारतीय व्यापारी आहे हे वानुआतुला नंतर कळले, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही दिवसापू्र्वीच ललित मोदी याने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता. ललित मोदी २०१० मध्ये भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झाला. शुक्रवारी(दि. ७) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ललित मोदी याने त्याचे भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, ललित मोदी यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे वानुअतूचे नागकत्व असल्याचेही समोर आले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या विरोधात आवश्यक कारवाई केली जाईल, असे जायसवाल यांनी स्पष्ट केले. ललित मोदी यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष असताना फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande