जम्मू-काश्मीरच्या 2 गटांवर 5 वर्षांसाठी बंदी
एएसी आणि जेकेआयएमवर लावले प्रतिबंध नवी दिल्ली, 11 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज, मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील 2 गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत 5 वर्षांसाठी प्रतिबंधीत संघटना म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधीत स
symbolic photo


एएसी आणि जेकेआयएमवर लावले प्रतिबंध

नवी दिल्ली, 11 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज, मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील 2 गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत 5 वर्षांसाठी प्रतिबंधीत संघटना म्हणून घोषित केले आहे.

प्रतिबंधीत संघटनांमध्ये उमर फारूख यांच्या नेतृत्वाखालील अवामी कृती समिती (एएसी) आणि मसरूर अब्बास अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन (जेकेआयएम) या दोन संघटनांचा समावेश आहे. यासंबंधीच्या अधिसूचनेत केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले की, ‘एएसी’ आणि ‘जेकेआयएम’ या दोन्ही संघटनांचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवादी कारवायांना आणि भारतविरोधी प्रचाराला पाठिंबा देत आहेत. या संघटना देशाच्या अखंडतेला, सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये देखील सहभागी आहे. उपलब्ध सर्व तथ्ये लक्षात घेता गृह मंत्रालयाने दोन्ही गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत 5 वर्षांसाठी बेकायदेशीर घोषित केल्याचे म्हटले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande