आसाममध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना पकडले
दिसपूर, 11 मार्च (हिं.स.) : आसाममध्ये अवैधपणे भारतीय हद्दीत शिरलेल्या 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. अब्दुल कबीर, बोधिऊर रहमान, मोहम्मद तय्यब आणि अब्दुल कलाम अशी त्यांची नावे आहेत. आसाम पोलिसांनी या चौघांना अटक करून त्यांच्या देशात परत पाठ
हिमंता बिस्वा सरमा


दिसपूर, 11 मार्च (हिं.स.) : आसाममध्ये अवैधपणे भारतीय हद्दीत शिरलेल्या 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. अब्दुल कबीर, बोधिऊर रहमान, मोहम्मद तय्यब आणि अब्दुल कलाम अशी त्यांची नावे आहेत. आसाम पोलिसांनी या चौघांना अटक करून त्यांच्या देशात परत पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) दिली.

यासंदर्भातील पोस्टमध्ये मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा म्हणाले की, घुसखोरीला आळा घालण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवत, आसाम पोलिसांनी 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आणि त्यांना सीमेपलीकडे परत पाठवले. दरम्यान या घुसखोरांना नेमकी कधी आणि कुठे अटक केली किंवा कोणत्या सीमावर्ती जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केले याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. गेल्या 7 महिन्यांत बांगलादेशातून 305 घुसखोरांना पकडण्यात आले आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आणि राज्य सरकार घुसखोरीमुक्त आसामसाठी वचनबद्ध आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केला होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी शेजारील देशात अशांतता सुरू झाल्यापासून, ईशान्येकडील 1885 किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने आपली दक्षता वाढवली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम पोलिस सीमेवर हाय अलर्ट ठेवत आहेत जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू शकणार नाही.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande