लाहोर , 12 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानमधील बलूचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) मंगळवारी(दि. ११) संपूर्ण जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती.
बीएलएच्या म्हणण्यानुसार, २१४ प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून, आतापर्यंत २० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय एक ड्रोनही पाडण्यात आले आहे. तर पाकिस्तान लष्कराने १६ दहशतवाद्यांना ठार करुन 104 जणांची सुटका केली आहे.अजूनही पूर्ण ओलिसांची सुटका झालेली नाही.
दरम्यान, प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तान बीएलएवर हवाई हल्ल्याच्या तयारीत असून असा हल्ला केलाच तर सर्व प्रवाशांची तासाभरात हत्या करू, असा इशारा बीएलएने दिला आहे.मात्र, या घटनेवर पाकिस्तानी लष्कर-पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएचा सामना करण्यासाठी पाक लष्कर हवाई हल्ल्याची तयारी करत असून हवाईशी संबंधीत यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. सर्व बलुच राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये कोणत्याही पाकिस्तानी एजन्सीचा किंवा सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा ही बलुचांची सर्वात मोठी मागणी आहे. चीनसोबत सीपीईसी प्रकल्प सुरू आहे, तो बंद करण्याची मागणी बलूच आर्मीची आहे. दरम्यान, या घटनेत पाकिस्तानी लष्कार किंवा पोलिसांकडून काहीच वृत्त आले नाही.
जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये 450 पेक्षा जास्त प्रवाशी होते. त्यात पाकिस्तान लष्कराचे जवान, अर्धसैनिक दलाचे जवान, आयएसआयचे कर्मचारी, पोलीस व सामान्य प्रवाशी होते. त्यातील सामान्य प्रवाशी आणि माहिला-मुलांना बलूच आर्मीने सोडून दिले. परंतु लष्कारातील जवान आणि आयएसआय कर्मचाऱ्यांसह एकूण 214 जणांना ओलीस ठेवले. बीएलएने पाकिस्तानच्या २० सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे.याशिवाय एक ड्रोनही पाडण्यात आले आहे. दुसरीकडे पाकिस्तान लष्कराने 16 दहशतवाद्यांना ठार करुन 104 जणांची सुटका केल्याचे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode