मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल
मदुराई, 12 मार्च (हिं.स.) : तामिळनाडूमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्यांना तमिळ कसे वाचायचे आणि लिहायचे हे माहित असले पाहिजे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने निकाल देताना म्हटले आहे.
हे संपूर्ण प्रकरण तामिळनाडू वीज मंडळाचे (टीएनईबी) कर्मचारी थेनी येथील एम जयकुमार यांच्याशी संबंधित आहे. गेल्या 2 वर्षांत तमिळ भाषेची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे जयकुमार यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. याविरुद्ध जयकुमार यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती जी जयचंद्रन आणि न्यायमूर्ती आर पूर्णिमा यांनी सांगितले की, तमिळ भाषेचे ज्ञान नसताना सरकारी कर्मचाऱ्याला काम करणे कठीण जाईल. उमेदवारांनी निर्धारित वेळेत सरकारी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि तमिळ भाषा न जाणता कोणीही सार्वजनिक पदाची नोकरी का करू इच्छितो…? असा प्रश्न उपस्थित केला.
यानंतर, न्यायालयाने दोन्ही पक्षांना अंतिम युक्तिवादासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आणि खटला 6 आठवड्यांसाठी तहकूब केला.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी