नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
- मागील आठ वर्षापासून आत्ता पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा करार अद्याप होतो झालेला नाही. महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा करार त्वरित करावा वैष्टी कर्मचाऱ्यांना भरीव वेतन वाढ द्यावी अन्यथा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी कामगार नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केली.
नुकतीच जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेची स्थापना करण्यात आली आहे या अध्यक्ष पदी एकमताने प्रीतीश छाजेड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पहिल्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये ते बोलत होते. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीकरता गंभीर दखल घ्यावी व त्वरित करार करून एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ लगेच झाली पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई घर भाडे भत्ता त्वरित अदा करावा. शासनाकडून वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत टाळाटाळ होत आहे एसटी कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या आश्वासनांची पूर्तता अध्यापवत झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून कर्मचाऱ्यांची वेतन वाढ करण्यात यावी, त्यांना महागाई भत्ता देण्यात यावा व एसटी कर्मचारी काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्वरित सोडवाव्यात अशी मागणी अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये आज केली. लोकनेते जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेची प्रथम राज्यस्तरीय बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. संघटनेचे सरचिटणीस आर डी गवळी यांनी आपल्या प्रास्ताविक केले.राज्य एसटी कर्मचाऱ्यांचे नेते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. अशोक जाधव यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत ठराव मांडले त्याला कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. या बैठकीत राज्याच्या उपाध्यक्षपदी नागपूरचे रिशू वैद्य, जळगाव जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्रसिंग पाटील, राज्याच्या कार्याध्यक्षपदी चंद्रकांत काकडे, व इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक चे सरचिटणीस डी ए लिपणे पाटील, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष चंद्रकांत काकडे, संघटनेची सरचिटणीस आरडी गवळी, अजय पाठक, कोषाध्यक्ष विठ्ठल बागुल, विजयसिंह परदेशी, केबी गवळी, रेशु वैद्य, गुलाबराव जानराव, राजेंद्र मुरडणार, बी एस राऊत, अमोल रणदिवे, श्रीकांत येडे, नंदू कांबळे, सागर खोडे, गजेंद्र वानखेडे, पोपटराव बच्छाव, संतोष मुंडावरे, विजय जाधव, नामदेव बाळासाहेब भुतडा, शहर काँग्रेसचे पदाधिकारी अल्तमश शेख, जिल्हा इंटक चे अध्यक्ष बाळासाहेब कासार, संतोष ठाकूर, गौरव सोनार, तनवीर खान, फारूक मन्सुरी, शबाज मिर्झा, प्रशांत खांबेकर, आदी राज्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI