दिसपूर, 27 मार्च (हिं.स.)।आयपीएलमध्ये बुधवारी(दि. २६) रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली.या सामन्यात क्विंटन डीकॉकने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर कोलकाता संघाने सहज विजय मिळवला. उल्लेखनीय बाब म्हणजे ९७ धावांच्या खेळीदरम्यान, डीकॉकने खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.
या सामन्यात डीकॉकने ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९७ धावा काढल्या. डीकॉकने केलेली ९७ धावांची खेळी ही धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सकडून कुठल्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. या बरोबरच डीकॉकने मनीष पांडे याने २०१४ साली पंजाब किंग्सविरोधात धावांचा पाठलाग करताना केलेल्या ९४ धावांच्या खेळीचा विक्रम मोडीत काढला. राजस्थान रॉयलने पहिला डाव खेळून १५१ धावा केल्या. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने सुरुवातीला राजस्थानला १५१ धावांवर रोखले. या १५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर क्विंटन डीकॉकने कोलकाला नाईटरायडर्सला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर क्विंटन डीकॉकने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर कोलकात्याने हे आव्हान सहजपणे पार करत विजय मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode