नेपीदो, 28 मार्च (हिं.स.)।म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि. २८) सकाळी दोन तीव्र भूकंपांनी पृथ्वी हादरली.म्यानमारमध्ये ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. हे भूकंप इतके शक्तिशाली होते की त्याचे धक्के बँकॉकपर्यंत जाणवले आहे.यामध्ये जीवित आणि वित्तहानी अद्याप निश्चित झालेली नसली तरी, इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठे नुकसान होऊ शकते. संभाव्य नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तात्काळ बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, म्यानमारमध्ये आज शुक्रवारी सकाळी ७.२ तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले.पहिल्या धक्क्याची तीव्रता ७.२ होती तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता ७.० होती. हा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र मध्य म्यानमारमध्ये जमिनीपासून १० किलोमीटर खाली होते.तर मोनीवा शहरापासून सुमारे ५० किलोमीटर (३० मैल) पूर्वेस होते.या विनाशकारी भूकंपाने केवळ स्थानिक क्षेत्रच नव्हे तर ग्रेटर बँकॉक प्रदेशालाही हादरवून टाकले. या भूकंपाच्या परिणामांबद्दल अद्याप कोणताही तपशीलवार अहवाल उपलब्ध नाही. भूकंपामुळे म्यानमारमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे, परंतु तात्काळ कोणताही अहवाल मिळालेला नाही.
ग्रेटर बँकॉक क्षेत्रात १.७ कोटींहून अधिक लोक राहतात, त्यापैकी बरीचशी लोक उंच इमारतींमध्ये राहतात. भूकंपाचे धक्के जाणवताच, बँकॉकमधील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारती खाली कराव्या लागल्या. बँकॉकच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून उंच इमारती आणि हॉटेलमधून बाहेर पडले. मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपाच्या धक्क्यांमुळे एका पुलाचेही नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode