म्यानमारमधील भूकंपात मृतांची संख्या १,७०० वर
नाएप्यीडॉ, 31 मार्च (हिं.स.)।म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि.२८) झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा १,७०० पेक्षा जास्त झाला आहे. ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती म्यानमार सरकारने आज, सोमवारी दिली. सरकारी प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन
Myanmar earthquake


नाएप्यीडॉ, 31 मार्च (हिं.स.)।म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि.२८) झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा १,७०० पेक्षा जास्त झाला आहे. ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती म्यानमार सरकारने आज, सोमवारी दिली.

सरकारी प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, ३,४०० जखमी झाले आहेत. ३०० हून अधिक बेपत्ता आहेत. शुक्रवारी(दि. २८) दुपारी ७.७ तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे राजधानी नैपिटाव आणि दुसरे सर्वात मोठे शहर मंडालेसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपात मृतांचा आकडा १,७०० पेक्षा जास्त झाला आहे. शुक्रवारीच्या मशीदमध्‍ये गदी कोसळल्याने सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्प्रिंग रिव्होल्यूशन म्यानमार मुस्लिम नेटवर्कच्या सुकाणू समितीचे सदस्य तुन की यांनी दिली आहे. भूकंपात सुमारे ६० मशिदींचे नुकसान झाले किंवा ते उद्ध्वस्त झाले. मंडालेमध्ये, भूकंप झाला तेव्हा २७० भिक्षू यू ह्ला थेन मठात धार्मिक परीक्षा देत होते, ज्यामुळे इमारत कोसळली. घटनास्थळी असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले की ,७० जण पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु ५० जण मृत आढळले आहेत आणि १५० जण बेपत्ता आहेत.या विनाशकारी भूकंपाने थायलंडची राजधानी बँकॉक हदरली आहे आणि किमान १८ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बरेच जण बांधकामाच्या ठिकाणी होते जिथे अर्धवट बांधलेली उंच इमारत कोसळली.प्रामुख्याने लोकप्रिय चतुचक मार्केटजवळील बांधकामाच्या ठिकाणी आणखी ३३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे आणि ७८ जण बेपत्ता आहेत. बँकॉकमध्ये मदत करण्यासाठी काही अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय बचाव समितीच्या म्यानमारमधील कार्यक्रम उपसंचालक लॉरेन एलेरी यांनी सांगितले की, सहा क्षेत्रांमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. सध्या सर्वात जास्त गरजा कुठे आहेत याचे मूल्यांकन केले जात आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानवतावादी पुरवठा आणि इतर मदत पुरवत आहेत. दरम्‍यान, रशिया, चीन, भारत आणि अनेक आग्नेय आशियाई देशांसह अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय बचाव पथके आता घटनास्थळी दाखल झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande