म्यानमार, बँकाँक भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले
* दिल्ली-एनसीआर, कोलकाता, मणिपूरमध्ये जाणवले धक्के बँकाँक, २८ मार्च (हिं.स.) : म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकाँक भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले. आज, २८ मार्च रोजी ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलच्या दोन लागोपाठ बसलेल्या धक्क्याने हाहा:कार उडाला आहे.
भूकंप


भूकंप


भूकंप


* दिल्ली-एनसीआर, कोलकाता, मणिपूरमध्ये जाणवले धक्के

बँकाँक, २८ मार्च (हिं.स.) : म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकाँक भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले. आज, २८ मार्च रोजी ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलच्या दोन लागोपाठ बसलेल्या धक्क्याने हाहा:कार उडाला आहे. या भूकंपाचे केंद्र मान्यमार येथील सागाइंग येथे आहे. हे केंद्र शहरापासून १६ किमी अंतरावर आहे. भूकंपाची केंद्राची खोली १० किलोमीटर खोल नोंदविली गेली आहे. याचे झटके थायलंडच्या बँकाँकपर्यंत जाणवले गेले आहे. त्यामुळे २६ डिसेंबर २००४ रोजी थायलंडला आलेल्या सुनामी लाटेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार भूकंपाचे केंद्र सागाईंग शहरापासून १६ किलोमीटर वायव्येस होते आणि त्याची खोली १० किलोमीटर होती.

भारतातही त्याचा परिणाम दिसून आला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि मणिपूरच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. म्यानमार व्यतिरिक्त, भूकंपाचे धक्के उत्तर थायलंड, चीनमधील युनान प्रांत आणि भारतातील कोलकाता आणि मणिपूरपर्यंत जाणवले. दिल्ली-एनसीआर, नोएडा आणि गाझियाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही.

भारत आणि ब्रह्मदेशाची टेक्टॉनिक प्लेट

म्यानमारच्या भूकंपाचे केंद्र सागाइंग असून ते भूकंपांच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे. ही अशी जागा आहे, येथून भारत आणि ब्रह्मदेशाच्या टेक्टॉनिक प्लेटच्या सीमा आहेत. ही फॉल्टलाईन सुमारे १२०० किलोमीटर लांबीची आहे. याच कारणाने म्यानमारला भूकंपाचा मोठा काळा इतिहास आहे. सागाइंगमध्ये टेक्टोनिक प्लेटचे मुव्हमेंट होत राहाते. परंतू यंदा भूकंपाची तीव्रता मोठी होती. इमारती कोसळणे, ब्रिज पडले याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सतर्क राहण्याचा आणि भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, शेजारील देशांमधील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मेट्रो आणि रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत. बँकॉकमध्ये लोक घाबरून अनेक इमारतींमधून बाहेर पडले आणि रस्त्यावर मोठी गर्दी दिसून आली.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, भूकंपाची नोंद २१.९३° उत्तर अक्षांश आणि ९६.०७° पूर्व रेखांशावर १० किलोमीटर खोलीवर झाली.

म्यानमारमधील नेपिदाव येथे अनेक ऐतिहासिक इमारती आणि बौद्ध मठांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत आणि बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

थायलंड आणि म्यानमारच्या अनेक भागात भूकंपामुळे काही इमारतींचे नुकसान झाले. तिथे बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मदत करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande