भंडारा, 18 एप्रिल (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या दिघोरी/मोठी येथे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका प्रमाणे शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यात तीन शिक्षक कार्यरत आहेत. परंतु येथे पगार बिल मात्र पाच शिक्षकांचे काढण्यात येत असल्याची तक्रार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना तक्रारदार करण्यात आली आहे.
शासनामार्फत नियमित शिक्षक भरती न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त केले जातात. परंतु भंडारा जिल्ह्यातील दिघोरी/मोठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे घड्याळी तासिका नियुक्ती तीन शिक्षकांची मात्र पगार बिल पाच शिक्षकांचे अशी तक्रार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीच्या अनुसगाने गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देट चौकशी केली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. हायस्कूलच्या शिक्षकांचा पगार माध्यमिक मधून काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या संदर्भात मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती दिली नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाला तसा अहवाल पाठवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगीतले आहे. तर हे संपूर्ण आरोप खोटं असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar