रयतच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भिंगार येथील ॲबट हायस्कूलची सलग आठव्यांदा निवड
अहिल्यानगर, 19 एप्रिल (हिं.स.)। रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल,भिंगार या विद्यालयाची सलग आठव्या वर्षी सातारा येथे होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.रयत संस्थेच्या ७५२ शाखांमधून
रयतच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भिंगार येथील ॲबट हायस्कूलची सलग आठव्यांदा निवड


अहिल्यानगर, 19 एप्रिल (हिं.स.)।

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल,भिंगार या विद्यालयाची सलग आठव्या वर्षी सातारा येथे होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.रयत संस्थेच्या ७५२ शाखांमधून सदर शाळेच्या गीताची निवड करण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्था,सातारा यांच्या वतीने संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ७ आणि ८ मे रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रयत संस्थेच्या ७५२ शाखांपैकी केवळ निवडक शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.यंदाही उत्तर विभाग, अहिल्यानगर यांच्यामार्फत झालेल्या निवड प्रक्रियेतून श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल,भिंगार या विद्यालयाच्या संघाची निवड झाली आहे.या संघामध्ये १४ मुलींचा सहभाग असून त्यांनी सादर केलेल्या समाजप्रबोधनपर तू ग दुर्गा! या गीताचे विशेष कौतुक झाले.या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा ढगे,माधव रेवगडे,सुरेखा डोईफोडे आणि गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या वतीने सदर गीतांमधील मुलींची गुलाब पुष्प आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande