भंडारा : तीन हजार शिक्षकांचे वेतन अडकले
भंडारा, 18 एप्रिल (हिं.स.) : शिक्षक भरती, मुख्याध्यापक नियुक्तीच्या शालार्थ आयडीचे प्रकरण गळ्याशी आल्याने शिक्षण विभागात धावाधाव सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर असल्यासारखा आहे. शिक्षणाधिकारीच
भंडारा : तीन हजार शिक्षकांचे वेतन अडकले


भंडारा, 18 एप्रिल (हिं.स.) : शिक्षक भरती, मुख्याध्यापक नियुक्तीच्या शालार्थ आयडीचे प्रकरण गळ्याशी आल्याने शिक्षण विभागात धावाधाव सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर असल्यासारखा आहे. शिक्षणाधिकारीच कार्यालयात नाहीत. यामुळे मार्च महिन्यातील पगारपत्रकावर स्वाक्षऱ्याच न झाल्याने जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शिक्षकांचे वेतन अडले आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची वेतन देयके वेतन पथक अधीक्षक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अदा केले जाते. साधारणतः एक तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असताना पंधरा दिवस होऊन शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा झालेले नाही. शिक्षण विभागातून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यावर ट्रेझरीमध्ये देयके जातात. मात्र स्वाक्षरी करणारे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे हेच कार्यालयात नसल्याने देयके पडून आहेत. शिक्षणाधिकारी केव्हा येणार, याची माहिती कुणालाही नाही. त्यामुळे शिक्षकांकडून विचारणा सुरू झाली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande