भंडारा, 18 एप्रिल (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या चिखला गावात रान डुकराच्या मागावर असलेल्या वाघ विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. चिखला गावासेजारी वाघ हा शिकार करण्याच्या प्रयत्नात रान डुकराचा पाठलाग करीत होता. रान डुक्कर शेतात सपाट विहिरीत पडला त्या पाठोपाठ वाघ देखील विहिरीत पडला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. शेतकरी शेतावर गेला असता त्यांना विहीरीत रानडुक्कर व वाघ मृत अवस्थेत दिसुन आला याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचून वाघाला व रान डुक्कराला विहिरीबाहेर काढण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar