नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.) - उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, ईस्टर रविवारच्या निमित्ताने, मी भारतभरातील सर्व नागरिकांना, विशेषतः हा पवित्र सण साजरा करणाऱ्या ख्रिश्चन समुदायाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
ईस्टर हे येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाद्वारे आशा आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे. करुणा, क्षमा आणि सेवा ही त्यांची शिकवण आपल्याला एक सुसंवादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतात.
या पवित्र दिवशी आपण सर्वांनी वंचितांच्या कल्याणासाठीच्या आपल्या बांधिलकीला नवसंजीवनी द्यावी आणि येशू ख्रिस्तांच्या निरपेक्ष प्रेमाचा संदेश बिंबवावा. शांतता आणि नवचैतन्य आपल्या देशात सदैव नांदत राहो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी