बंगळुरू, 20 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकच्या बंगळुरू येथील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने इंडिगो विमानाला धडक दिली. ही घटना शुक्रवारी (18 एप्रिल) दुपारी घडली. या घटनेचा फोटो आज, रविवारी व्हायरल झाल आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार कॅम्पेगौडा विमानतळाच्या अल्फा पार्किंग बे 71 येथे दुपारी 12.15 वाजता वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, हा टेम्पो एका तृतीय-पक्ष ग्राउंड हँडलिंग एजन्सीचा होता आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी वापरला जात होता. टेम्पोशी टक्कर झालेले विमान इंजिन दुरुस्तीसाठी आधीच ग्राउंड करण्यात आले होते. यामुळे एकही प्रवासी उपस्थित नव्हता. यासंदर्भात इंडिगोने जारी केलेल्या निवेदनानुसार टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. टेम्पो विमानाला धडकला, ज्यामुळे छताचे आणि वाहनाच्या चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून विमानाचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेण्यात येत आहे.
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, या अपघाताची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) देण्यात आली आहे
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी