बांगलादेशातून एक लाख लोक भारतात घुसले- महफुज आलम
ढाका , 2 एप्रिल (हिं.स.)। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी दावा केला की, बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, शेख हसीना यांच्य
Unus sarkar


ढाका , 2 एप्रिल (हिं.स.)। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी दावा केला की, बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, शेख हसीना यांच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी उपस्थित असलेल्या ईद समारंभात आलम यांनी हे विधान केले.

‘महापौर डाक’ या मानवाधिकार गटाने शहरातील तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी महफुज आलम म्हणाले की, “भारताने शेख हसीना आणि त्यांच्या दहशतवादी शक्तींना त्यांच्या देशात आश्रय देणे निवडले आहे हे खूप दुर्दैवी आहे. तसेच १ लाखाहून अधिक अवामी लीग सदस्य भारतात पळून गेले आहेत आणि भारताने त्या सर्वांना आश्रय दिला आहे.”अशी खळबळजनक माहिती यांनी दिली आहे.यावेळी बांगलादेश सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनीही शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप केले. हसीनावर टीका करताना ते म्हणाले, “बहुतेक जबरदस्तीने बेपत्ता होण्याचे प्रकार २०१३ आणि २०१४ मध्ये घडले जेव्हा लोक त्यांच्या मतदानाच्या अधिकारासाठी लढत होते आणि त्यांच्या कृतीमागील मुख्य हेतू बांगलादेशची निवडणूक व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करणे हा होता.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande