नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित
* सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली, २० एप्रिल (हिं.स.) : 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना स
नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित


* सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली, २० एप्रिल (हिं.स.) : 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कार देखील पंतप्रधानांच्या हस्ते दिले जातील.

पंतप्रधानांनी नेहमीच भारतातील नागरी सेवकांना नागरिकांच्या हितासाठी समर्पित राहण्यासाठी, सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्ध राहण्यासाठी आणि कामात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले आहे. यावर्षी, जिल्ह्यांचा समग्र विकास, आकांक्षी तालुका कार्यक्रम आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये 16 पुरस्कार प्रदान करतील. या पुरस्कारांद्वारे सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande