दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू
दिंडोरी, 25 एप्रिल (हिं.स.)। - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यातील वणारवाडी या ठिकाणी शेतामध्ये गवत काढत असलेल्या वीस वर्षीय युती वरती सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी पाटाजवळ
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील घटना


दिंडोरी, 25 एप्रिल (हिं.स.)।

- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यातील वणारवाडी या ठिकाणी शेतामध्ये गवत काढत असलेल्या वीस वर्षीय युती वरती सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दिडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी पाटाजवळ राजू चव्हाण यांची शेती असून, गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते. त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी ऊसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला. बिबट्याने तिच्या मानेला धरले तिने आरडाओरड केला. तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरल्याचे पाहताच आरडाओरड केला. त्यावेळी पायल कडे धावले त्यानंतर बिबट्याने पायलला 6-7 फूट ओढत नेले.

आजूबाजूचे शेतकरी पायलचे वडील चुलते व नातेवाईक ऊसाकडे धावले बिबट्याने गलका आवाज ऐकल्यावर पायलला तिथेत सोडून पळ काढला.

पायलला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली .तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यानी तपासणी केली असता पायलला मृत घोषित केले. दरम्यान वारंवार बिबट्यांच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी व पायलच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदना नंतर पायलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आल्याचे समजते आहे. बिबट्याचाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande