भीमटेकडी कौडण्यपूर येथील सभामंडपाचे लोकार्पण
अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) :माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार अॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या विकासनिधीतून निर्माणित कौडण्यपूर भीमटेकडी येथील सभामंडपाचे लोकार्पण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमद
भीमटेकडी कौडण्यपूर येथील सभामंडपाचे लोकार्पण


अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) :माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार अॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या विकासनिधीतून निर्माणित कौडण्यपूर भीमटेकडी येथील सभामंडपाचे लोकार्पण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार अॅड. यशोमतीताई ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीपराव काळबांडे स्वागताध्यक्ष होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजाताई आमले, माजी सभापती शिल्पाताई हांडे, कौडण्यपूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमदास राठोड, प्रज्ञशील धम्म विहार, भीमटेकडीचे अध्यक्ष राजेंद्र नाखले, कोषाध्यक्ष प्रा. पंकज वाघमारे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, प्रा. महादेवराव गडलिंग, किशोर नारे, गौतम ढोणे, मधुकर सोमकुंवर, मधुकर सवाळे, रुपराव मनोहरे, सिदधार्थ मुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कौडण्यपूर भीमटेकडी येथे अनेक वर्षांपासून बौद्ध धम्मउपासक, उपासिकांची वर्दळ असते. त्यांमुळेभीमटेकडीच्या विकासाची मागणी नागरकांकडून केली जात होती. त्याची दखल घेत यशोमतीताई ठाकूर यांच्या निधीतून याकामाला गती देण्यात आली आणि अखेर हे काम पूर्ण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष यशोमतीताई ठाकूर यांनी यावेळी सभामंडपाच्या लोकार्पणाप्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त करित विकासासाठी सर्वतोपरी प्रय़त्न करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी प्रज्ञाशील धम्म विहार समितीच्यावतीने यशोमतीताई ठाकूर यांचा सत्कार सुद्दा करण्यात आला. या प्रसंगी श्रीराम पखाले, राजकुमार सवाळे, सिदधार्थ फाटके, बंडू ढोणे, गणेश गडलिंग, अमोल काळे, संजय काळे, दीपक वानखेडे आदींचा सुद्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ मुंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर सवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र नाखले, प्रा. पंकज वाघमारे, गोकुलभाउ खाकसे, मधुकरराव सोमकुंवर,महेंद्र डोंगरे, दिलीप पखाले, आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande